राज्य कॅरम स्पर्धेला शुक्रवारपासून प्रारंभ, ३०२ खेळाडूंचा सहभाग

  • By admin
  • April 17, 2025
  • 0
  • 59 Views
Spread the love

सागर वाघमारे, समृद्धी घाडीगावकरला अग्र मानांकन 

मुंबई ः मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन बोरिवली आयोजित व रोटरी क्लब ऑफ बोरिवली यांच्या सहयोगाने १० व्या एमसीएफ महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला शुक्रवारी (१८ एप्रिल) सकाळी ९ वाजता सुरुवात होत आहे. 

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटना यांच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेत पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन्ही गटात मिळून एकंदर ३०२ कॅरमपटूंनी भाग घेतला आहे. पुरुष एकेरी गटात पुण्याच्या सागर वाघमारे व महिला एकेरी गटात ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरला अग्र मानांकन देण्यात आले आहे. एमसीएफ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, प्रेमनगर, बोरिवली (पूर्व) येथे १८, १९ व २० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते रात्रौ ८ दरम्यान सामने खेळविले जातील. या सामन्यांचे थेट प्रसारण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून करण्यात येणार असून मराठी, हिंदी व इंग्रजी मधून धावते समालोचनहि करण्यात येईल.

स्पर्धेतील मानांकन 

पुरुष एकेरी : १) सागर वाघमारे (पुणे), २) विकास धारिया (मुंबई), ३) पंकज पवार (ठाणे), ४) महम्मद घुफ्रान (मुंबई), ५) प्रशांत मोरे (मुंबई), ६) संजय मांडे (मुंबई), ७) रिझवान शेख (मुंबई उपनगर), ८) योगेश परदेशी (पुणे).

महिला एकेरी : १) समृद्धी घाडीगावकर (ठाणे), २) आकांक्षा कदम (रत्नागिरी), ३) मधुरा देवळे (ठाणे), ४) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ५) रिंकी कुमारी (मुंबई), ६) मिताली पाठक (मुंबई), ७) श्रुती सोनावणे (पालघर), ८) अंजली सिरीपुरम (मुंबई).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *