
ठाणे : वेगवेगळ्या स्तरावर जे क्रीडा शिक्षक चांगले काम करत आहेत त्यांचे कौतुक झाले पाहिजे असे प्रतिपादन ठाणे क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद वाघमोडे यांनी केले आहे.
सरस्वती एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ठाणे या शाळेला भेट देऊन आठ मार्चला अहिल्या दौड आयोजित केली होती. सदर दौडमध्ये विद्यार्थिनींचा मोठा सहभाग व्हावा यासाठी दौड प्रमुख प्रमोद वाघमोडे विद्यालयास आवाहन केले होते. प्रतिसाद म्हणून सदर शाळेच्या १२५ विद्यार्थ्यांनी व पाच शिक्षकांनी सहभाग घेतला. ठाण्यातील इतर सर्व शाळांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेली शाळा म्हणून सरस्वती शाळेचे नाव घोषित करण्यात आले.
महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद वाघमोडे यांनी यावेळी सत्कार केला. या प्रसंगी मुख्याध्यापिका शिल्पा नारकर, प्राची चव्हाण, नामदेव पाटील, सिद्धी पडेल, नूतन जोशी यांची उपस्थिती होती.
तसेच या प्रसंगी नवनियुक्त प्राचार्य शिल्पा नारकर यांची प्राचार्य पदी नियुक्त झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राजीव मेंदळे व मुंबई विभाग संपर्क प्रमुख प्रमोद वाघमोडे आदी उपस्थित होते.
GOOD JOB WAGHMODE SIR EVERY GOOD WORK SHOULD BE APPRECIATED 👍✨🧿