
जळगाव ः जळगाव येथील ॲड ओम त्रिवेदी आणि आई रेखा त्रिवेदी यांचे ज्येष्ठ पुत्र आकाश त्रिवेदी यांची निवड भारतातील अत्यंत प्रतिष्ठित संस्था आयआयएम अहमदाबाद मध्ये एमबीए अभ्यासक्रमासाठी झाली आहे.
आकाशने आयआयटी कानपूर येथून बी टेक (कम्प्युटर सायन्स) पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर एमबीए प्रवेशाची सीएटी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. आयआयएम अहमदाबादमध्ये एमबीए साठी निवड झालेला बहुतेक आकाश हा जळगाव जिल्ह्यातून एकमेव विद्यार्थी आहे. आकाश हा प्राथमिक शाळेतील शिक्षणापासून अव्वल गुणवत्तेत आहे.
२०१७ मध्ये तो पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीस पात्र ठरला होता. २०१६ मध्ये तो सहकारी विद्यार्थी सोबत राष्ट्रीयस्तरावरील ‘स्पेल बी’ स्पर्धेत सहभागी झाला होता. २०१७ मध्ये तो आयजेएसओ परीक्षेची दुसरी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाला होता. २०१८ मध्ये केंद्र सरकारची एनटीएसई परीक्षा गुणवत्तेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीधारक ठरला होता. २०१९ मध्ये त्याने राष्ट्रीयस्तरावरील केव्हीपी परीक्षेत उत्तम गुण मिळवून पुरस्कार पटकावला होता. २०२० मध्ये राष्ट्रीयस्तरावरील जेईई अॅडव्हान्स परीक्षा राष्ट्रीयस्तरावर २२६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण केली होती. त्यानंतर आकाश आयआयटी कानपूरमध्ये बी टेक (कम्प्युटर सायन्स) अभ्यासक्रमासाठी पात्र ठरला होता.