
धुळे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर क्रिकेट सुविधांची पाहणी केली. यावेळी धुळे जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहितदादा पवार, मानद सचिव ॲड कमलेश पिसाळ, अपेक्स कौन्सिल सदस्य सचिन मुळे, राजवर्धन कदमबांडे आणि अतुल जैन यांनी धुळे जिल्ह्यातील विविध क्रिकेट स्टेडियम्सचा, क्रिकेट सुविधांचा पाहणी दौरा केला.
या दौऱ्यात धुळे येथील कुंडाणे क्रिकेट स्टेडियम, शिरपूर येथील अमरीश पटेल सीबीएसई स्कूल आणि मुकेश आर पटेल स्कूल येथील क्रिकेट मैदानाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन क्रिकेट इन्फ्रास्ट्रक्चर, महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल), महिला क्रिकेट आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या भविष्यातील व्हिजन यावर सविस्तर चर्चा झाली.
या प्रसंगी एसव्हीकेएमचे जॉइंट प्रेसिडेंट तसेच धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष लहू पाटील, सचिव प्रीतेशभाई पटेल, सदस्य राजन चौक आणि इतर पदाधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसेच शाळेचे कर्मचारी उपस्थित होते. धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.