
छत्रपती संभाजीनगर ः गजानन हॉल, हर्सूल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खुल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे फा-हियान शोतोकान कराटे डो असोसिएशनतर्फे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महेंद्राज लॉयन्स स्पोर्ट्स अँड करिअर अकॅडमी व आर जे अकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावत घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून ५५० च्या जवळपास खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेच्या नियोजनात छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा सिकई मार्शल आर्ट असोसिएशनचे सचिव रफिक जमादार यांचे महत्वाचे योगदान होते. या स्पर्धेत आर जे अकॅडमी व महेंद्राज लॉयन्स स्पोर्ट्स अँड करिअर अकॅडमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांना कराटेचे मुख्य प्रशिक्षक महेंद्र रंगारी आणि रहीम जमादार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. टीम मॅनेजर म्हणून प्रज्योत पारधे यांनी काम पाहिले.
विजेते खेळाडू
या स्पर्धेत कुमिते व काता या प्रकारात ऋषिकेश मोरे, समर्थ जोरले, पवन गायकवाड, अनस शेख, अभय लोखंडे, अदनान खान या खेळाडूंनी लक्षवेधक कामगिरी नोंदवत सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकांची कमाई करुन स्पर्धा गाजवली.
स्पर्धेचे आयोजक अरुण पाईकडे, रफिक जमादार, डॉ मकरंद जोशी, डॉ शत्रुंजय कोटे, डॉ मीनाक्षी मुलीया, गोपाल पांडे, संकर्षण जोशी, गणू पांडे, सागर कुलकर्णी, विवेक चर्जन, मनीषा चर्जन, महेश पूर्णपात्रे, बाळकृष्ण खानवेलकर, किरण कुलकर्णी, रावसाहेब सांगळे, महेश विबांडिक, स्वप्नील परदेशीं, सुवर्णा कुलकर्णी, विनोद चव्हाण, महेश पात्रे, बाळू गोरे, सचिन जाधव, अनिता सिन्नरकर, रवींद्र ढिवरे आणि फिरोज शेख यांनी सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले.