वेस्ट इंडिज महिला संघाचे स्वप्न भंगले 

  • By admin
  • April 20, 2025
  • 0
  • 9 Views
Spread the love

विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर खेळाडू मैदानावरच रडू लागले 

नवी दिल्ली ः भारतात होणाऱया एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिज महिला संघ कमी नेट रन रेटमुळे पात्र होऊ शकला नाही. अवघ्या १०.१ षटकात १६७ धावांचे लक्ष्य गाठून वेस्ट इंडिज संघाने रोमांचक विजय नोंदवला. परंतु, कमी नेट रन रेटमुळे वेस्ट इंडिज संघाचे स्वप्न भंगले. विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर खेळाडू मैदानावरच रडू लागले. 

यावर्षी भारतात होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकासाठी पात्रता सामने पाकिस्तानमध्ये खेळवण्यात आले होते, ज्यामध्ये एकूण ६ संघांनी भाग घेतला होता. शनिवारी खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजला विजयासाठी १६७ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. विश्वचषकासाठी पात्र होण्यासाठी त्यांना हे लक्ष्य १०.१ षटकात गाठायचे होते परंतु संघाने फक्त ४ चेंडू जास्त खेळले. परिणामी, बांगलादेश पॉइंट्स टेबलमध्ये वेस्ट इंडिजपेक्षा फक्त ०.०१३ नेट रन रेटने पुढे होता आणि वेस्ट इंडिज विश्वचषकातून बाहेर पडला.

पात्रता सामन्यांमध्ये, पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने त्यांचे सर्व ५ सामने जिंकून पात्रता मिळवली. पाकिस्तान या स्पर्धेसाठी आपला संघ भारतात पाठवणार नसला तरी, त्यांना हायब्रिड मॉडेलमध्ये खेळायचे आहे. ही स्पर्धा बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यात होती, कारण फक्त दोनच संघ विश्वचषकासाठी पात्र ठरू शकले. दोन्ही संघांनी ३-३ सामने जिंकले पण वेस्ट इंडिज नेट रन रेटमध्ये थोड्या फरकाने मागे पडला.

वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट संघाने १६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऐतिहासिक विजय मिळवला. कर्णधार हेली मॅथ्यूजने २९ चेंडूत जलद ७० धावा केल्या, तर चिनली हेन्रीने १७ चेंडूत ४८ धावा केल्या. संघाने हा सामना फक्त १०.५ षटकांत जिंकला, पण जर त्यांनी ५ चेंडू कमी वेळात हे साध्य केले असते तर आज त्यांचे नाव बांगलादेश संघाऐवजी विश्वचषक खेळणाऱ्या संघांमध्ये समाविष्ट झाले असते.

या पराभवामुळे दुःखी झालेल्या वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेटपटूंना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्या मैदानावर रडू लागल्या. बांगलादेशचा नेट रन रेट ०.६३९ होता आणि वेस्ट इंडिजचा नेट रन रेट ०.६२६ होता, फरक फक्त ०.०१३ होता.

महिला विश्वचषकासाठी पात्रता मिळवणारे संघ

भारत (यजमान), ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका (टॉप ५ संघ), बांगलादेश आणि पाकिस्तान (क्वालिफायरमध्ये जिंकणारे २ संघ).

महिला क्रिकेट विश्वचषक वेळापत्रक

ही स्पर्धा २९ सप्टेंबर ते २६ ऑक्टोबर दरम्यान भारतात खेळवली जाईल. ८ संघांमध्ये एकूण ३१ सामने खेळवले जातील. विश्वचषकाचे सामने मुल्लानपूर (मोहाली), इंदूर, रायपूर, तिरुअनंतपुरम आणि विशाखापट्टणम येथे खेळवले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *