आरसीबी संघाचा पंजाबवर सात विकेटने विजय

  • By admin
  • April 20, 2025
  • 0
  • 28 Views
Spread the love

विराट कोहली, देवदत्त पडिक्कलची धमाकेदार फलंदाजी 

चंदीगड ः अनुभवी आक्रमक फलंदाज विराट कोहलीच्या धमाकेदार नाबाद ७३ धावा आणि देवदत्त पडिक्कलच्या तुफानी ६१ धावांच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने पंजाब किंग्ज संघावर सात विकेट राखून मोठा विजय नोंदवला. 

आरसीबी संघासमोर विजयासाठी १५८ धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबी संघाच्या डावाची  सुरुवात खराब झाली. फिल सॉल्ट (१) लवकर बाद झाला. त्यानंतर अनुभवी विराट कोहली व देवदत्त पडिक्कल या  जोडीने स्फोटक फलंदाजी करुन सामना एकतर्फी बनवला. या जोडीने दुसऱ्या  विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी करुन संघाचा विजय निश्चित केला. देवदत्त पडिक्कल याने अवघ्या ३५ चेंडूत ६१ धावा फटकावल्या. आक्रमक अर्धशतक ठोकताना त्याने चार उत्तुंग षटकार व पाच चौकार मारले. 

विराट कोहली याने ५४ चेंडूत नाबाद ७३ धावा फटकावत संघाच्या शानदार विजयावर शिक्कामोर्तब केले. विराट कोहली याने आपल्या दमदार खेळीत एक षटकार व सात चौकार मारले. कर्णधार रजत पाटीदार (१२) स्वस्तात बाद झाला.  जितेश शर्मा (नाबाद ११) समवेत विराट कोहली याने १९व्या षटकात संघाला मोठा विजय मिळवून दिला. आरसीबी संघाने १८.५ षटकात तीन बाद १५९ धावा फटकावत सात विकेटने सामना जिंकला. अर्शदीप सिंग (१-२६), हरप्रीत ब्रार (१-२७), युजवेंद्र चहल (१-३६) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. 

पंजाबची फलंदाजी गडगडली 

पंजाबने २० षटकांत सहा गडी गमावून १५७ धावा केल्या. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर पंजाबने चांगली सुरुवात केली. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी २६ चेंडूत ४२ धावा जोडल्या. तथापि, यानंतर, पंजाबची मधली फळी डळमळीत झाली आणि संघाची धावसंख्या ६८ धावांत तीन विकेट अशी झाली.

पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. प्रियांश आर्यम आणि प्रभसिमरन सिंग यांनी २६ चेंडूत ४२ धावांची सलामी भागीदारी केली. पाचव्या षटकात कृणाल याने प्रियांश याला टिम डेव्हिडकडून झेलबाद केले. त्यानंतर त्याने सातव्या षटकात प्रभसिमरन सिंग याला डेव्हिडकडून झेलबाद केले. प्रियांशने १५ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह २२ धावा केल्या आणि प्रभसिमरनने १७ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या. यानंतर श्रेयस खराब शॉट खेळून बाद झाला. रोमारियो शेफर्डच्या गोलंदाजीवर तो कृणाल याने झेलबाद झाला. श्रेयसला १० चेंडूत फक्त सहा धावा करता आल्या.

यानंतर, जोश इंग्लिस आणि नेहल वधेरा यांच्यात गैरसमज झाला आणि दोन धावा घेण्याचा प्रयत्न करत असताना नेहल धावबाद झाला. तो फक्त पाच धावा करू शकला. जोश इंग्लिसने शशांक सिंगसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण लेग-स्पिनर सुयश शर्माने १४ व्या षटकात दोन विकेट घेत पंजाबला पुन्हा अडचणीत आणले. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सुयशने इंग्लिसला क्लीन बोल्ड केले. इंग्लिसने १७ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २९ धावा केल्या.

यानंतर, षटकाच्या पाचव्या चेंडूवर सुयश याने मार्कस स्टोइनिस याला क्लीन बोल्ड केले. स्टोइनिसला फक्त एक धाव करता आली. शेवटी, मार्को जानसेन आणि शशांक यांनी ४३ धावा जोडून पंजाबला १५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. यानसेन २० चेंडूत दोन षटकारांसह २५ धावांवर नाबाद राहिला आणि शशांक ३१ धावांवर नाबाद राहिला. बेंगळुरूकडून कृणाल आणि सुयशने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दरम्यान, रोमारियो शेफर्ड याला एक विकेट मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *