
अंबाजोगाई ः अंबाजोगाई शुमा कप लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत आयुष इलेव्हन संघाने विजेतेपद पटकावले. शिवम व्हिजन संघ उपविजेता ठरला.
इनरव्हील क्लब ऑफ अंबाजोगाईतर्फे प्रकाशचंद सुरजमल मुथा यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चार संघांचा सहभाग होता. विजेत्या संघाला डॉ सिद्धेश्वर बिराजदार, डॉ राजेश इंगोले, सिरसाट, देशमुख, प्रेमा मुथा, विजया मुथा, भूषण गवळी, संगीता मुथा, निलेश मुथा, समीर लाटा, प्रतीक बोथरा, हर्ष मुथा यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सुरेखा सिरसाट यांनी मार्गदर्शन केले. रेहाना पाटील यांनी पारितोषिक प्रदान केले. भूषण गवळी यांनीही यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी सुरज कांबळे, रुपेश जाधव, माही परमार, लीना किथे, चोबे, पवार, कुलकर्णी, रेहाना यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मोहित परमार, अलोक भारती, यशवंत शिनगारे, शिवम पाटील, प्रणव केंद्रे, आयुष दामा आदींनी परिश्रम घेतले.