
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनतर्फे (मेसा) एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूलला भेट देण्यात आली.
बीड बायपास परिसरात असलेल्या एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूलला मेसा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. या प्रसंगी राज्य अध्यक्ष प्रवीण आव्हाळे, राज्य उपाध्यक्ष नागेश जोशी, राज्य कोषाध्यक्ष डॉ संजय पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील मगर पाटील, प्रवीण राऊत या सर्वपदाधिकाऱ्यांचे स्वागत संस्था चालक तुकाराम मुंढे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.