
नाशिक ः वणी येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे प्रथम वर्ष कला वर्गात शिकलेला माजी विद्यार्थी नितीन पवळे यास शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील महाराष्ट्र शासनाचा क्रीडा पुरस्कार योगासन या क्रीडा प्रकारात पहिला शिवछत्रपती पुरस्कार राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
पुणे येथे बालेवाडी क्रीडा संकुलात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. तसेच संस्थेचे सरचिटणीस डॉ नितीन ठाकरे, दिंडोरी तालुका कार्यकारिणी संचालक प्रवीण जाधव, शिक्षणाधिकारी डॉ नितीन जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन शिंदे, स्थानिक विकास समिती अध्यक्ष राकेश थोरात, डॉ वाय एम साळुंके, उपप्राचार्य, प्रा नितीन बोरसे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ रवींद्र चव्हाण यांनी नितीन पवळे याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.