
अभिराम गोसावीचे पाच विकेट, श्रीवत्स कुलकर्णी, श्रीनिवास लेहेकरची प्रभावी गोलंदाजी
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए अंडर १९ क्रिकेट स्पर्धेच्या सुपर लीग सामन्यात छत्रपती संभाजीनगर संघाने प्रेसिडेंट इलेव्हन संघावर ४६ धावांची आघाडी घेतली आहे. अभिराम गोसावी याने २७ धावांत पाच विकेट घेऊन संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
डिझायर स्पोर्ट्स कॉर्पोरेशन मैदानावर हा सामना होत आहे. छत्रपती संभाजीनगर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगर संघाने पहिल्या डावात ३२.५ षटकात सर्वबाद १६१ धावा काढल्या. त्यानंतर प्रेसिडेंट इलेव्हन संघाचा पहिला डाव ३४.५ षटकात १५२ धावांत गडगडला. छत्रपती संभाजीनगर संघाने नाममात्र ९ धावांची आघाडी घेण्यात यश मिळवले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर संघाने दुसऱया डावात १३ षटकात तीन बाद ३७ धावा काढून ४६ धावांची आघाडी घेतली आहे.
संक्षिप्त धावफलक ः छत्रपती संभाजीनगर ः पहिला डाव ः ३२.५ षटकात सर्वबाद १६१ (रुद्राक्ष बोडके २३, जय हारदे १८, राघव नाईक २१, कृष्णा खवळ १२, श्रीवत्स कुलकर्णी ३५, सुमित सोळुंके १३, अभिराम गोसावी नाबाद १९, आर्यन पठारे ५-४४, साहिल गोपाळघरे २-४२, अनुज चौधरी २-५, पुष्कर अहिरराव १-९).
प्रेसिंडेट इलेव्हन ः पहिला डाव ः ३४.५ षटकात सर्वबाद १५२ (आदित्य घोगरे १९, आनंदू १६, पुष्कर अहिरराव ८, जशन सिंग ३३, वेदांत गोरे ३५, अभिराम गोसावी ५-२७, श्रीनिवास लेहेकर ३-२८, श्रीवत्स कुलकर्णी २-४०).
छत्रपती संभाजीनगर ः दुसरा डाव ः १३ षटकात तीन बाद ३७ (राम राठोड १२, रुद्राक्ष बोडके ८, अविनाश मोटे ६, अभिराम गोसावी नाबाद ९, जय हारदे नाबाद ०, आर्यन पठारे १-१४, साहिल गोपाळघरे १-११, अनुज चौधरी १-११).