
पुणे ः पटणा (बिहार) येथे ११ ते १५ मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षांखालील खेलो इंडिया युथ गेम या स्पर्धेसाठी महाराष्ट्र कुस्ती संघ जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र कुस्ती संघाची निवड चाचणी घेण्यात आली आणि या निवड चाचणीतून महाराष्ट्र संघ निवडण्यात आला असे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी सांगितले.
महाराष्ट्राचा कुस्ती संघ
फ्रीस्टाईल ः प्रणव घारे (५१ किलो), सोहम कुंभार (५५ किलो), प्रणव मोरे (६० किलो), पवन धायगुडे (६५ किलो), संजय तनपुरे (७१ किलो), रोहित आजबे (८० किलो), सुरज चोरघे (९२ किलो).
ग्रीको-रोमन ः आदित्य जाधव (५१ किलो), आदित्य ताटे (५५ किलो), स्वराज चौधरी (६० किलो), ओमराज वाईगडे (६५ किलो), अभिमन्यू चौधर (७१ किलो), सोहमराज मोरे (८० किलो), हर्ष ठाकरे (९२ किलो).
महिला कुस्ती संघ
ऋतुजा गुरव (४६ किलो), प्रतिक्षा कोळी (४९ किलो), साक्षी धुमाळ (५३ किलो), आयुष्का गादेकर (५७ किलो), श्रुती श्रीनाथ (६१ किलो), सृष्टी खरे (६५ किलो), प्रणाली पुयड (६९ किलो).