
नागपूर ः देहरादून येथे झालेल्या राजसिंग डुंगरपूर करंडक स्पर्धेत विदर्भाच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने राजस्थान संघाविरुद्धचा पहिला सामना अनिर्णित ठेवला.
विदर्भाच्या गोलंदाजांनी राजस्थानला पहिल्या डावात १७८ धावांवर रोखले. मानव वाकोडेने ३८ धावांत पाच बळी घेतले. प्रत्युत्तरात विदर्भाने एका वेळी पाच बाद १४४ धावा केल्या होत्या. परंतु केवळ २२ धावांमध्ये त्यांनी शेवटचे पाच बळी गमावले. नागेश उमाळेने सर्वाधिक ४९ धावा केल्या. परंतु, विदर्भ १६६ धावांवरच बाद झाला. त्यांनी स्वीकारलेली १२ धावांची आघाडी अखेर निर्णायक ठरली. कारण राजस्थानने त्यांच्या दुसऱ्या डावात तीन बाद १२६ धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला.
संक्षिप्त धावफलक ः राजस्थान अंडर-१४ पहिला डाव ः ५३.२ षटकांत सर्वबाद १७८8 (कौस्तुभ धनकर ७३, सचिन मीना ३०, मानव वाकोडे ५/३८).
विदर्भ अंडर-१४ पहिला डाव ः ६७.४ षटकांत सर्वबाद १६६ (नागेश उमाळे ४९, अध्यांत महाजन २०, मानव वाकोडे २४, समर्थ नाथानी २७, हिमांशू ४-१२, कृष्णा ३-१६).
राजस्थान अंडर-१४ दुसरा डाव ः ४५ षटकात तीन बाद १२६ (कुशवर्धन चौहान ३६, रायन सेबॅस्टियन ३४, वशिष्ठ २८, स्पर्श धनवझीर २-२६).