भारतीय डॉजबॉल संघ निवड समितीच्या अध्यक्षपदी प्रा एकनाथ साळुंके

  • By admin
  • April 22, 2025
  • 0
  • 36 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः मलेशिया येथे होणाऱया आशियाई डॉजबॉल स्पर्धेसाठी निवडण्यात येणाऱ्या भारतीय डॉजबॉल निवड समितीच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजीनगरचे प्रा एकनाथ साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

दि इंडियन डॉजबॉल फेडरेशनच्या वतीने येत्या २५ ते २७ एप्रिल दरम्यान दक्षिणा कन्नडा, मंगळुरु (कर्नाटक) येथे होणाऱ्या तिरंगी आंतरराष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धा (भारत, नेपाळ, मलेशिया) आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरुष, महिला व मिक्स डॉजबॉल स्पर्धा यामधून भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेतून निवडलेला संघ मलेशिया येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

भारतीय संघ निवडीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथील प्रा एकनाथ साळुंके यांची निवड करण्यात आली आहे. ते दि इंडियन डॉजबॉल फेडरेशनचे उपाध्यक्ष, राज्य डॉजबॉल संघटनेचे महासचिव असून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त आहेत.

या निवड समितीत समन्वयक विजीत (कर्नाटक), सदस्य म्हणून नसीब (हरियाणा), संजय रानावणे (मध्य प्रदेश), वोडुलु यादव (तेलंगणा), पलक सोंदारा (गुजरात), डोमनिक (पोदुचेरी), मोनिषा, विसरत (खेळाडू प्रतिनिधी) हे असणार आहेत.  या निवडीची माहिती दि इंडियन डॉजबॉल फेडरेशनचे सेक्रेटरी जनरल नरसिमा रेड्डी के यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

राज्य डॉजबॉल संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पवार, निमंत्रित उपाध्यक्ष संगम डंगर, महेंद्र कुमार मोटघरे, सहसचिव प्रा संतोष खेंडे, रमेश शिंदे, रेखा साळुंके, विजय मोटघरे, राज्य रेफ्री बोर्ड चेअरमन अभिजीत साळुंके, सागर तांबे, डी. आर. खैरनार, हरी गायके, असद शेख, महंमद रफी, बबन गायकवाड, बाल मुकुंद सोनवणे, गणेश बेटुदे, पांडुरंग कदम, डॉ रणजीत पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, पंकज भारसाकळे, डॉ उदय डोंगरे, गोकुळ तांदळे, बाजीराव भुतेकर, बद्रुद्दीन सिद्दिकी, कुरेशी अख्तर, आशिष कान्हेड यांनी प्रा एकनाथ साळुंके यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *