
युनिव्हर्सल वन-डे लीग क्रिकेट ः मोहम्मद अली सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर १६ एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत पाटील क्रिकेट अकादमी संघाने जाधव क्रिकेट अकादमी संघावर नऊ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात मोहम्मद अली याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक राहुल पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजन युनिव्हर्सल क्रिकेट ग्राउंडवर केले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने युवा खेळाडूंना एकदिवसीय सामना खेळण्याचा चांगला अनुभव प्राप्त होत आहे. त्यामुळे ही स्पर्धा युवा खेळाडूंना लाभदायक ठरत असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले.
युनिव्हर्सल क्रिकेट मैदानावर मंगळवारी झालेल्या या सामन्यात जाधव क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत ४०.५ षटकात सर्वबाद १९१ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात पाटील क्रिकेट अकादमी संघाने ३०.५ षटकात एक बाद १९४ धावसंख्या फटकावत नऊ विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला.
या सामन्यात निखिल भालेराव याने आक्रमक शतक साजरे केले. निखिल याने ९२ चेंडूंचा सामना करत १०२ धावा फटकावल्या. त्याने शतकी खेळीत १३ चौकार मारले. मोहम्मद अली याने ६३ चेंडूत ४५ धावा फटकावल्या. त्याने पाच चौकार व दोन षटकार मारले. रितेश कलोड याने ४३ धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याने सहा चौकार मारले.

गोलंदाजीत श्रीरंग कुलकर्णी याने १६ धावांत तीन विकेट घेऊन आपला ठसा उमटवला. मोहम्मद अली याने ४९ धावांत तीन गडी बाद करुन अष्टपैलू कामगिरी बजावली. दर्शन भारसकाळ याने १३ धावांत एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक ः जाधव क्रिकेट अकादमी ः ४०.५ षटकात सर्वबाद १९१ (दानिश शेख २०, मुफद्दल ताहेर टाकसाळी २१, रितेश कलोड ४३, श्रेणिक दुधेडिया २५, नोमन ११, ध्रुव पुंड नाबाद १७, इतर ४७, मोहम्मद अली ३-४९, श्रीरंग कुलकर्णी ३-१६, वैभव खराटे १-४४, दर्शन भारसकाळ १-१३, निखिल भालेराव १-३८) पराभूत विरुद्ध पाटील क्रिकेट अकादमी ः ३०.५ षटकात एक बाद १९४ (मोहम्मद अली ४५, निखिल भालेराव नाबाद १०२, आदित्य शिंदे नाबाद २१, इतर २६, श्रेणिक दुधेडिया १-२९). सामनावीर ः मोहम्मद अली.