
पुणे ः नवी दिल्ली येथे झालेल्या नवी दिल्ली ओपन फिडे रेटेड १८०० खालील बुद्धिबळ स्पर्धेत व्हिक्टोरियस चेस अकादमीची स्टुडंट राध्या मल्होत्रा हिने चमकदार कामगिरी बजावली. राध्या मल्होत्रा हिने या स्पर्धेत नऊपैकी ६.५ गुणांची कमाई केली व सर्वोत्कृष्ट महिला तृतीय पारितोषिक संपादन केले. तिने साडेसात हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळवले. या कामगिरीबद्दल व्हिक्टोरियस चेस अकादमीतर्फे राध्याचे अभिनंदन करण्यात आले.