
राज्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा
छत्रपती संभाजीनगर ः नागपूर येथे २४ ते २६ एप्रिल या कालावधीत होणाऱया राज्यस्तरीय १४ व १७ वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरचा मुलांचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
छावणी परिषदेच्या क्रीडांगणावर टेनिस बॉल क्रिकेट संघ निवडण्यासाठी तीन दिवसीय शिबीर घेण्यात आले. या शिबिरातून अंतिम संघ निवडण्यात आला. या संघाच्या प्रशिक्षकपदी कृष्णा सुरे यांची निवड करण्यात आली आहे. निवडण्यात आलेल्या संघास छावनी परिषद बोर्डचे उपाध्यक्ष प्रशांत तारगे, निलेश धारकर, अक्षय धारकर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सुरेश मिरकर, सचिव सत्येंद्र चपटे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
अंडर १४ क्रिकेट संघ
जीत पांडे, विघ्नेश राठोड, इशांत सुतार, सत्यजीत शेजूळ, वेद बडगुजर, सुभोजीत पाल, शौर्य साळवे, दिक्षांत खरात, आदित मोरे, शौर्य जाधव, राजवीर बहुरे.
अंडर १७ क्रिकेट संघ
सुदीक्ष हातोळे, अनमोल कांबळे, स्वराज लोखंडे, शेरयश नक्की, चैतन्य उके, अश्विन आमटे, स्वप्नील कांबळे, रुशल गायकवाड, सुमित डोंगरदिवे, रवी मालेवाड, सुमेध मोराळकर.