
नाशिक ः निफाड येथील रिव्हर साईड गोल्फ कोर्स येथे गोल्फ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रिव्हर साईड गोल्फ कोर्स, निफाड आणि मीनका रिवरडेल यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथील रिव्हर साईड गोल्फ कोर्स येथे मीनका रिव्हरडेल गोल्फ कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध गटातील खेळाडूंचा वाढता सहभाग बघता
या स्पर्धेमध्ये ज्युनियर गट, कॅडेट गट आणि खुला गट अशा तीन गटांचा समावेश करण्यात आला आहे.
गोल्फ खेळाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक इंद्रजित भलोटिया आणि बान फाऊंडेशनचे आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिबान लाहिरी यांच्या संयुक्त प्रयत्नातून निफाड येथे लहान मुलांना वर्षभर प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी या मुलांसाठी स्वतंत्र गट तयार करून स्पर्धा घेतल्या जात आहेत. २५ एप्रिल रोजी गोल्फ या खेळामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे सर्व कॅडिज यांच्यासाठी स्पर्धा घेतली जाणार आहे. २६ आणि २७ एप्रिल रोजी नवोदित आणि खुल्या गटांची स्पर्धा घेतली जाणार आहे.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी अपर्णा मोटर्स मुंबई यांची नाशिक येथील मीनका रिव्हर डेल या बांधकाम क्षेत्रातील कंपनी, वासन टोयाटो, प्रो टच आणि बान फाउंडेशन यांनी विविध प्रकारे आयोजनासाठी मदत केली आहे. या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन २६ एप्रिल रोजी एअर कमोडर एओसी २५ ईडी देवळाली साऊथ यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता लेफ्टनंट जनरल एन एस सरना यांच्या हस्ते पार पडणार आहे. एन एस सरना यांना लष्करी सेवेतील अतिविशिष्ट सेवा मेडल प्रदान करून सन्मानित कऱण्यात आले आहे. त्याचबरोबर निफाड येथील रिव्हर साईड गोल्फ कोर्स येथे साकारण्यात आलेल्या रिसॉर्टचे उद्घाटन संपन्न होणार आहे.
तरी या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू आणि पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून या स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहित करावे असे आवाहन विंग कमांडर प्रदीप बागमार, शितल बागमार, नितिन हिंगमिरे, मनिष शाह, मिलिंद भागवत आणि इतर आयोजकांनी केले आहे.