
नागपूर ः देहरादून येथे सुरू असलेल्या राजसिंग डुंगरपूर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत विदर्भ आणि छत्तीसगड सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात विदर्भ संघाकडून रौनक हेडाऊ यांनी शानदार अष्टपैलू कामगिरी बजावली.
विदर्भाच्या १४ वर्षांखालील संघाने छत्तीसगड संघाविरुद्ध चमकदार कामगिरी बजावली. विदर्भ संघाने पहिल्या डावात २४९ धावसंख्या उभारली. त्याच्या प्रत्युत्तरात छत्तीसगड संघ एक बाद १५० असा भक्कम स्थितीत होता. मात्र, विदर्भ संघाच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत छत्तीसगड संघाचा डाव २२८ धावांवर रोखून आघाडी घेतली.

विदर्भ संघाने पहिल्या डावात २१ धावांची महत्त्वाची आघाडी घेण्यात यश मिळवले. रौनक हेडाऊ (३-२६), स्पर्श धनवाजीर (३-३७), हिरेन त्रिवेदी (२-१७), मानव वाकोडे (२-४६) यांनी अचूक मारा केला. रौनक हेडाऊ हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. अनिर्णित सामन्यात विदर्भ संघाने तीन गुणांची कमाई केली. छत्तीसगड संघाला एक गुण मिळाला.
संक्षिप्त धावफलक
विदर्भ अंडर १४ पहिला डाव ७८.३ षटकांत सर्वबाद २४९ (नागेश उमाळे ३९, मानव वाकोडे २२, समर्थ नाथानी ६४, रौनक हेडाऊ ६०, सुजल दिवांगण ४/५८).
छत्तीसगड अंडर १४ पहिला डाव ७५.२ षटकात सर्वबाद २२८8 (युवराज यादव ७६, अंशुमन ठाकूर ४५, अंकुश यादव ३९, रौनक हेडाऊ ३-१६, स्पर्श धनवजीर ३-३७).