
ज्ञानेश चेरलेची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड
नांदेड ः भारतीय धनुर्विद्या संघटनेच्या वतीने यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरजमल विहार दिल्ली येथे आयोजित फायनल नॅशनल रँकिंग आर्चरी स्पर्धेसाठी नांदेडच्या सृष्टी जोगदंड हिची निवड झाली आहे. तसेच ज्ञानेश चेरले याची बिहार येथे ४ ते १५ मे दरम्यान आयोजित सातव्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे, अशी माहिती जिल्हा सचिव वृषाली पाटील जोगदंड यांनी दिली.
मागील वर्षातील चार राष्ट्रीय रँकिंग स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी सृष्टी जोगदंड केली आहे. त्यात गुवाहाटी, देहरादून, पुरी ओडिशा व हिमाचल प्रदेश येथील राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत दिल्ली येथे होणाऱ्या फायनल नॅशनल रँकिंग आर्चरी स्पर्धेत प्रथम क्रमांकाने थाटात प्रवेश मिळविला आहे. यमुना नगर सुरजमल विहार दिल्ली येथील स्पर्धेत ज्युनियर रिकर्व्ह प्रकारात महाराष्ट्रातून सृष्टी जोगदंड ही एकमेव खेळाडू यात सहभागी होणार आहे.
ज्ञानेश बालाजी चेरले याने शालेय धनुर्विद्या स्पर्धेत केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची ४ ते १५ मे दरम्यान बिहार येथे आयोजित सातव्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. त्याचे प्रशिक्षण शिबीर पुणे बालेवाडी क्रीडाी संकुल येथे होत आहे.
दोघांच्याही या निवडीबद्दल नांदेड जिल्हा आर्चरी संघटनेच्या वतीने सचिव आणि मुख्य प्रशिक्षक वृषाली पाटील जोगदंड यांच्यासह ऑलिम्पिक प्रशिक्षक रविशंकर, प्रफुल डांगे, डॉ मुकेश मालू, डॉ सुमेध वाघमारे, डॉ हंसराज वैद्य, नांदेड तालुका संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास भुसेवार, जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश तमलुरकर, मुन्ना कदम कोंडेकर, मालू कांबळे, सतीश पाटील जाधव, बालाजी चेरले, माधव दुयेवाड, शिवाजी पुजरवाड, शिवाजी पाटील इंगोले, संजय चव्हाण, डॉ विजय वडजे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक ब्रिजेश कुमार, प्रशिक्षक पिंकी राणी, प्रलोभ कुलकर्णी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपिले, डॉ राहुल वाघमारे, लक्ष्मण फुलारी, डॉ दिनकर हंबर्डे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.