
छत्रपती संभाजीनगर : कर्नाटक येथे राष्ट्रीय डॉजबॉल पुरुष महिला व मिक्स स्पर्धा २६ आणि २७ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा संघ महासचिव प्रा एकनाथ साळुंके यांनी जाहीर केला.
दि इंडियन डॉजबॉल फेडरेशन महासचिव नरसिमा रेड्डी के व महासचिव राज्य डॉजबॉल संघटना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा एकनाथ साळुंके यांनी संघातील खेळाडूंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र पुरुष संघात कुणाल राठोड (कर्णधार), वरद शिंपी (उपकर्णधार), सिद्धेश दरेकर, सुयश साळवे, अयान मुनीर तांबोळी, आदित्य मंदे, विक्रम जैस्वाल, हर्ष यादव, आर्यन पाटील, सर्वेश पाटील, मितांशु कर्पे, करमन सिंग हुंडल या खेळाडूंचा समावेश आहे. प्रशिक्षक म्हणून प्रा. रमेश शिंदे आणि व्यवस्थापक म्हणून वर्षा नलावाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र महिला संघात स्नेहा पवार (कर्णधार), मेहारुंनिसा तस्लिमा शेख (उपकर्णधार), दीक्षा बोराडे, तेजस्विनी गोरे, पल्लवी खरगे, वृंदा सिंग,
तिथी प्रामाणिक, श्रावणी दिवेकर, आरती पाटील, लास्य राव, रिद्धि खैरनार, राजनंदिनी जोगळेकर या खेळाडूंचा समावेश आहे. या संघाचे प्रशिक्षक म्हणून महेंद्र कुमार मोटघरे आणि व्यवस्थापक म्हणून प्रियांका कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मिश्र संघात सिद्धेश दरेकर (कर्णधार) दीक्षा बोराडे (उपकर्णधार), वरद शिंपी, कुणाल राठोड, मेहारुंनिसा तस्लिमा शेख, प्राची वेळंजकर, साईवी भोसले, प्रियदर्शनी दळवी, रणवीर गुलमकर, वेदांत देवरे, समर्थ मळेकर, गायत्री जाधव या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या संघाचे प्रशिक्षक म्हणून अभिजीत साळुंके आणि व्यवस्थापक म्हणून स्नेहा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या संघाला डॉजबॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष राजेंद्र पवार, उपाध्यक्ष संगम डंगर, उपाध्यक्ष महेंद्र कुमार मोटघरे, सहसचिव प्रा संतोष खेंडे सहसचिव रमेश शिंदे, रेखा साळुंके आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.