
छत्रपती संभाजीनगर ः पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यु झाला. या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल संघटनेच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध चौकात जाऊन सायकलपटूंनी भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, हम सब एक है, पाकिस्तान मुर्दाबाद घोषणा देत पाकिस्तानचा निषेध केला आहे.
भारतीय बांधवांना पहलगाममध्ये आंतकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये जे मृत्यूमुखी पडले त्यांना सायकल रॅली मार्फत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सर्व सायकलपटूंनी काळ्या रंगाचे टी-शर्ट व काळी बीन हाताला बांधून सायकल रॅलीत सहभाग घेतला होता.
या सायकल रॅलीमध्ये जिल्हा सायकल संघटनेचे सायकलपटू निखिल कचेश्वर, अतुल जोशी, मनीष खंडेलवाल, चरणजित सिंग संघा, मोहन उन्हाळे, प्रसाद जोशी, अंकुश केदार, हरिश्चंद्र मात्रे, रवींद्र जोशी, संतोष बेडके, अनिल सुलाखे, किशोर दिनकर, अभय गांधी, बालाजी नारगुडे, विजयकुमार लाहोटी, आकाश टाके, अजय पांडे, सतीश कोलते, गजानन पिसे, मनप्रीत कौर संघा, रोहिदास चोंढे, चंद्रकांत कदम, साई जोशी, संतोष हिरेमठ, अमेय कुलकर्णी, जयंत सांगवीकर, प्रफुल्ल मोहरील, रमेश सोनटक्के सहभागी झाले होते.