मेहनत, सातत्य ठेवल्यास शंभर टक्के यश मिळतेच ः प्रमोद वाघमोडे 

  • By admin
  • April 26, 2025
  • 0
  • 117 Views
Spread the love

सांगली : महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली संचलित रेवनाळ हायस्कूल रेवनाळ मध्ये माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

शाळेच्या पटांगणामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शाळेचे माजी विद्यार्थी एसएससी १९९९ बॅचचे प्रमोद धोंडीराम वाघमोडे यांची मुंबई विभाग संपर्क प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ ठाणे या पदावर निवड झाल्याबद्दल विद्यालयातर्फे मुख्याध्यापक दिलीप वाघमोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेचे माजी विद्यार्थी लखन टकले यांची एमपीएससी २०२३ सहाय्यक या पदी निवड झाल्याबद्दल विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.

शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. दोन्ही माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील मुलांना अगदी मोलाचे मार्गदर्शन केले. मुंबई विभाग संपर्क प्रमुख आणि ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ अध्यक्ष प्रमोद वाघमोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेप्रती असलेले आपले प्रेम व्यक्त केले तसेच शाळेला आदर्श विद्यालयाचा नुकताच पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यार्थी व सर्व मुख्याध्यापक शिक्षक वर्गांचे कौतुक केले. शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व खेळांमध्ये असलेले ग्रेस गुण, मोबाईलचा वापर, विद्यार्थ्यांची मानसिक आरोग्य कसे संतुलित ठेवता येईल त्याचबरोबर आपण चांगली मनापासून मेहनत केली तर आपल्या प्रयत्नामध्ये सातत्य ठेवले तर शंभर टक्के यश मिळते याचा कानमंत्र मुलांना देण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना व शाळेला सर्व शिक्षकांना शुभेच्छा देऊन सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

दुसरी सत्कारमूर्ती लखन टकले यांनी मुलांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, आपण स्वतः कशा पद्धतीने अभ्यास केला याविषयी मुलांशी संवाद साधला. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक दिलीप वाघमोडे यांनी हे दोन्ही विद्यार्थी आपल्या शाळेचे हिरे असल्याचे सांगत या हिऱ्यांना कसे पैलू पडत गेले या विषयी सांगितले. 

शाळेचे शिक्षक प्रवीण वाघमोडे यांनी आभार व्यक्त करताना सत्कार मूर्तींचा प्रवास कथन करत जीवनात कशा पद्धतीने संघर्ष करावा आणि संघर्ष केल्यानंतर यश हे कशा पद्धतीने मिळतं याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होनमाने यांनी केले. यावेळी संस्थेचे समन्वय समितीचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक डी ए वाघमोडे, शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सुवर्णा वाघमोडे, मंडले, प्रवीण, जाधव, अनुसे, होनमाने, गलांडे, कचरे, नामदेव ओलेकर, मायाप्पा वाघमोडे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *