खेळाडूंना चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल – आबेदा इनामदार

  • By admin
  • April 26, 2025
  • 0
  • 34 Views
Spread the love

पुणे ः पुणे शहरात अनेक चांगले खेळाडू आहेत, ज्यांनी आपल्या क्षमतेच्या जोरावर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला आहे. या खेळाडूंना सन्मानित करण्यासाठी गेल्या २ वर्षांपासून आझम स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने मुलांसाठी डॉ पी इनामदार क्रीडा गुणवत्ता पुरस्कार व मुलींसाठी आबेदा इनामदार क्रीडा गुणवत्ता पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यावर्षी देखील या पुरस्कारांचे वितरण व्ही. एम. गणी सभागृह, आझम कॅम्पस येथे करण्यात आले. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना आबेदा इनामदार म्हणाल्या की, आझम स्पोर्ट्सच्या वतीने नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येते. यामुळेच आझम स्पोर्ट्स अकादमीचे अनेक खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. याचबरोबरीने इतर खेळाडूंना देखील प्रोत्साहन मिळावे, यासाठीच हा पुरस्कार सुरू करण्यात करण्यात आला आहे. हा पुरस्कार नक्कीच खेळाडूंना भविष्यात चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा देईल, असे त्या म्हणाल्या.

यावेळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे सचिव इरफान शेख, अकादमीचे सदस्य साबीर शेख, आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉ गुलजार शेख, दिशा स्पोर्ट्स अँड करियर अकादमीचे अध्यक्ष दत्तात्रय सरडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.  

डॉ पी इनामदार क्रीडा गुणवत्ता पुरस्कार (मुले)

१) गौरव भोसले – अॅथलेटिक्स, २) केशव गायकवाड – व्हॉलीबॉल, ३) स्मित गुंजाळ – स्केटिंग, ४) वैष्णव ठाकूर – वेटलिफ्टिंग, ५) अथर्व बिडकर – बॉक्सिंग, ६) विशाल ताठे – कबड्डी, ७) अथर्व कुमार – हॉकी, ८) सुयश गरगटे – खो-खो, ९) प्रज्वल मोरे – क्रिकेट, १०) अभिजित त्रिपाणकर – कॅरम.
 
आबेदा इनामदार क्रीडा गुणवत्ता पुरस्कार (मुली)

१) अल्फीया शेख – हॉकी, २) ऋतुजा भोसले – अॅथलेटिक्स, ३) मृणाल आगरकर – व्हॉलिबॉल, ४) प्रणवी डोईफोडे – स्पीड स्केटिंग, ५) प्राणवती नामरे – वेटलिफ्टिंग, ६) प्रीती कांबळे – सॉफ्टबॉल, ७) देविका घोरपडे – बॉक्सिंग, ८) निकिता पडवळ – कबड्डी, ९) ओवी ढोरे – तिरंदाजी, १०) ईश्वरी अवसरे – क्रिकेट.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *