
रेल्वेची स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धा ः मयूर राठोड सामनावीर
सोलापूर ः मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्यूटच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत अ गटाच्या सामन्यात पुष्प अकादमीने मॉडेल क्रिकेट अकादमी संघाला पाच गडी राखून पराभूत केले.
येथील रेल्वे मैदानावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात झालेल्या या सामन्यात मॉडेल अकादमीने सर्वबाद ११९ धावा काढल्या. त्यानंतर विजयी १२० धावांचे लक्ष्य पुष्प अकादमीने पाच गडी गमावत गाठले. पाच बळी टिपणारा मयूर राठोड सामन्याचा मानकरी ठरला. त्यास वरिष्ठ क्रिकेट खेळाडू उदय डोके यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. प्रत्येक सामनावीर पुरस्कार सुदेश व सुनील मालप यांच्याकडून देण्यात येत आहेत. पंच म्हणून मोहित दिकोंडा व नितीन गायकवाड तर गुुणलेखक म्हणून गेनबा सुरवसे यांनी काम पाहिले.
संक्षिप्त धावफलक
मॉडेल क्रिकेट अकॅडमी : ३३ षटकांत सर्वबाद ११९ (चांद शेख २८, अनुज मुंदडा १९, समर्थ कोळी १९ धावा, मयूर राठोड ५ बळी, प्रशांत घोडके, रोहित बिराजदार, अभिजित सिंग प्रत्येकी १ बळी) विजयी विरुद्ध पुष्प जिमखाना क्रिकेट अकॅडमी : २२.४ षटकांत ५ बाद १२० (जगदीश जाधव नाबाद ५१, प्रशांत घोडके १८, आदर्श सिंग १५ धावा, गौरव वडे २ बळी, उदय आगलावे, अनुज मुंदडा, अमित चव्हाण प्रत्येकी १ बळी).