राज्य टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेत वर्धा, यवतमाळ, पुणे, ठाणे, बीड संघ विजेते

  • By admin
  • April 26, 2025
  • 0
  • 92 Views
Spread the love

वर्धा : टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या मान्यतेने तसेच अवधेश क्रीडा मंडळ वर्धा व वर्धा जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत वर्धा, यवतमाळ, पुणे, ठाणे, बीड या संघांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत महाराष्ट्रातून मिनी व युथ गटांमध्ये १५ जिल्ह्यांचा समावेश होता. उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानी राज्य अध्यक्ष सुरेश रेड्डी क्यातमवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून टेनिस व्हॉलबॉल खेळाचे जनक डॉ व्यंकटेश वांगवाड, राज्य सचिव गणेश माळवे, राज्य उपाध्यक्ष रामेश्वर कोरडे, संजय ठाकरे, सतिश नावाडे, अशोक शिंदे, तेजस पाटील, वर्धा जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव डॉ विनय मुन यांची उपस्थिती होती.

उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी राज्य अध्यक्ष सुरेश रेड्डी क्यातमवार म्हणाले की, भारतीय टेनिस व्हॉलीबॉल खेळाचा प्रसार विदर्भात जोमाने झाला पाहिजे. भारतीय खेळाला जागतिक पातळीवर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असावे. सर्व संघांना शुभेच्छा दिल्या व मोलाचे मार्गदर्शन केले.

डॉ व्यंकटेश वांगवाड म्हणाले की, लवकर आशिया क्रीडा स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात येईल. राज्य सचिव गणेश माळवे यांनी यांच्या भाषणात सांगितले की, ओडिशा येथे होणऱ्या १ ते ४ मे २०२५ या दरम्यान राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड करण्यात येईल.

विजयी संघास पुष्प गुच्छ व ट्रॉफी प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अवधेश क्रीडा मंडळ सचिव विनय मुन, उपसचिव दिवाकरराव मुन, कोषाध्यक्ष सुनील ढाले, अविंक मुन, गौरव चैनानी, रोमदेव बालपांडे, दर्शन हस्ती, सोनाली भारोटे, विभा मेश्राम, ओम मुळे, सौरभ कोसुलकर, ओम धामंदे, अनिकेत कांबळे, अनिकेत काळे, वैभव साठे, प्रवीण शेंडे, फाल्गुन लोहकरे यांनी परिश्रम घेतले.

अंतिम निकाल

युथ मुले ः १. यवतमाळ. २. मुंबई शहर, ३. नाशिक. युथ मुली ः १. वर्धा, २. ठाणे, ३. मुंबई उपनगर. युथ मिश्र दुहेरी : १. ठाणे, २. नवी मुंबई, ३. परभणी. मिनी मुले संघ : १. पुणे, २. ठाणे, ३. परभणी. मिनी मुली ः १. बीड, २. नाशिक, ३. हिंगोली. मिनी मिश्र दुहेरी : मिक्स इवेंट ः १. पुणे, २. नाशिक, ३. नवी मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *