
नाशिक : मीनका रिव्हरडेल गोल्फ स्पर्धांना रिव्हरसाईड गोल्फ कोर्स, निफाड येथे शानदार सुरुवात झाली आहे. नाशिकच्या समीर खानने कॅडी गोल्फ स्पर्धा जिंकली आहे.
लहान मुलांच्या गटाच्या स्पर्धा पार पडल्या. कॅडी गोल्फ म्हणजे या खेळातील कॅडि म्हणजेच (मदतनीस /बॉल बॉय) यांच्यासाठी विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक, नागपूर व मुंबई येथून हे स्पर्धक सहभागी झाले होते. एकूण १८ होलच्या या स्पर्धेत २३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यात नाशिकच्या समीर खानने एकूण ६७ स्ट्रोक मध्ये ही स्पर्धा जिंकली तर नागपूरच्या काशीद शेख याने ७३ स्ट्रोक मारून द्वितीय स्थान प्राप्त केले.
या स्पर्धकांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे आयोजक व रिव्हर साईड गोल्फ कोर्सचे संचालक विंग कमांडर प्रदीप बागमार यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
रविवारी (२७ एप्रिल) या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ व रिव्हरसाईड गोल्फ कोर्स येथील रिसॉर्टचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल एन एस सरना कमांडंट स्कूल ऑफ आर्टी, देवळाली, नाशिक, विंग कमांडर अरुणकुमार सिंग, अध्यक्ष जी सी एस अँड एम ए आय, नवी दिल्ली. मिनका रिव्हर डेलचे संचालक व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रसंगी रिव्हर साईडचे अध्यक्ष, सचिव तथा सर्व पदाधिकारी, खेळाडू यांच्या उपस्थितीत होणार आहे.