
हिंगोली ः नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी हिंगोली जिल्ह्यातून १४ वर्षे वयोगट मुले, १७ वर्षे वयोगट मुली व १७ वर्षे वयोगट मुले व तिन्ही संघ नागपूर येथे राज्यस्तरीय स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाले आहेत.
हिंगोली जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून निवड चाचणी घेण्यात आली. या तिन्ही संघांमध्ये हिंगोली जिल्ह्याच्या वतीने एकता युवा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या खेळाडूंची निवड झाली आहे. १७ वर्ष वयोगट मुलींमध्ये स्वाती सूर्यवंशी, अस्मिता फटांगळे, भूमिका घनमोडे, दीक्षा लोणकर, दिव्या घनमोडे, गायत्री मुंदडा, जानवी गुजर, पायल जाधव, पूनम खंदारे, सलोनी रहाटे, शिवकन्या घनमोडे, स्वाती कोरडे, तर वयोगट १७ वर्ष मुलांमध्ये करण वाठोरे, रोहित जाधव, जय दंडे, प्रतीक वाठोरे, शिवम सुरोशे, गणेश सोनटक्के, स्वराज दराडे, मकरंद कुलकर्णी, राज जाधव, वयोगट १४ वर्ष मुलांमध्ये जयदत्त दंडे, कार्तिक मुळे, शेख अफान, संविधान घोंगडे, राम सूर्यवंशी, आर्यन उघडकर, राज जाधव, स्वराज दराडे, राहुल इंगोले या खेळाडूंची राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेटसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंसोबत प्रशिक्षक म्हणून एकता युवा स्पोर्ट्स फाउंडेशन हिंगोली सचिव गजानन आडे, रहीम कुरेशी, शंकर पोघे, गजानन समोसे हे आहेत. या निवडीबद्दल एकता युवा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पदाधिकारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले