
सोलापूर ः छत्रपती शिवाजी शिक्षण संकुल व रुद्रशक्ती गुरुकुल यांच्या वतीने शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे, अशी माहिती विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा सचिन गायकवाड यांनी दिली.
शैक्षणिक सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थी युवकांना मोबाईलवर टीव्ही, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या अतिवापरापासून दूर करण्यासाठी तसेच शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण शिबीर येत्या २ ते १६ मेपर्यंत सकाळी ७ ते ९ या वेळेत शिवकालीन मर्दानी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या शिबिरास मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्कीन मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरासाठी मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष माजी महापौर मनोहरपंत सपाटे, रुद्र शक्ती गुरुकुलचे अध्यक्ष योगिनाथ फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य सुजाता ज्यूगदार, प्राचार्य मंजुश्री सपाटे-पाटील, प्रा संतोष गवळी, क्रीडा शिक्षक मारुती घोडके, नितीन गोरे, दत्ता सुतार व दत्ता भोसले यांचे सहकार्य लाभणार आहे.
शिबिरात शिकवले जाणारे प्रकार
लाठी काठी, फरी गदगा, दांडपट्टा, भाला, फास, उर्मी, तलवारबाजी, मैदानी खेळ, सेल्फ डिफेन्स यासह पारंपरिक क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सरस्वती चौक येथील छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज येथे हे प्रशिक्षण होणार आहे. नोंदणीसाठी 9503039627 अथवा 97650 00426 या नंबरवर संपर्क साधावा.