
नंदुरबार ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय व महाराष्ट्र जम्परोप असोसिएशन नंदुरबार जिल्हा जम्परोप असोसिएशन यांच्या संयुक्त विघमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय जम्परोप स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकार सुनंदा पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा जम्परोप असोसिएशन अध्यक्ष राजेश भैय्या रघुवंशी, तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील, राज्य जम्परोप असोसिएशनचे सचिव दीपक निकम, जिल्हा जम्परोप असोसिएशन उपाध्यक्ष बंटीबाबा सुळ, रवीभाऊ रावल आदी मान्यवर उपस्थित होते.
या राज्यस्तरीय शालेय जम्परोप स्पर्धेत राज्यभरातून.१२० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी संजय बेलोकर, क्रीडा अधिकारी ओमकार जाधव, मुकेश बारी, महेंद्र काटे, कल्पेश पाटील, भगवान पवार, जिल्हा जम्परोप सचिव रामा हटकर आदींनी परिश्रम घेतले.