
सातारा ः साताऱ्याच्या बुद्धिबळ क्षेत्राला अभिमान वाटावा अशी घटना घडली आहे. आंतरराष्ट्रीय आर्बिटर म्हणून ख्याती असलेल्या कविराज सावंत यांनी दुषान्बे, ताजिकिस्तान येथे होत असलेल्या पश्चिम आशिया युवा बुद्धिबळ स्पर्धेसाठी प्रयाण केले आहे.
बुद्धिबळ स्पर्धेमध्ये नियमांचे अचूक पालन आणि निष्पक्ष न्यायनिवाडा सुनिश्चित करण्याची जबाबदारी आर्बिटरवर असते. विविध देशांतील युवा खेळाडू या स्पर्धेत आपल्या बुद्धिमत्तेची चुरस दाखवणार आहेत, आणि कविराज सावंत यांचा अनुभव व दक्षता या स्पर्धेच्या सुव्यवस्थेसाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे. सातारा आणि महाराष्ट्रातील बुद्धिबळप्रेमी समाजाने त्यांच्या या गौरवशाली निवडीचे मनःपूर्वक स्वागत केले आहे. कविराज सावंत यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.