एमसीए क्लब डिझाईन स्पर्धा प्रदर्शनात दिग्गज संस्थांचा सहभाग

  • By admin
  • April 27, 2025
  • 0
  • 41 Views
Spread the love

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर यांच्यावतीने तसेच सीओए यांच्या सहकार्याने एमसीए इंटरनॅशनल क्लब डिझाईन स्पर्धा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात भविष्यातील क्रीडा सुविधा कशा असाव्यात या संकल्पनेवर आधारित क्रिकेट व वास्तुकला मधील सर्जनशीलतेचा अनोखा संगम होता. या प्रदर्शनात देशभरातील नामांकित आर्किटेक्ट्सनी सहभाग घेतला होता. दोन दिवस हे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

या प्रसंगी चंद्रशेखर कानेटकर, पद्मश्री डॉ गोपाल शंकर, समीप पडोरा, विलास अवचट, अबीन चौधरी, उषा रंगराजन, विकास अचलकर या देशभरातील प्रसिद्ध आर्किटेक्ट संस्थेच्या मान्यवर मंडळींसह कपिल जैन, महेश बांगड, पराग देशपांडे तसेच आयआयए पुणे केंद्राचे अध्यक्ष विकास आचळकर, एमसीएचे सचिव कमलेश पिसाळ, सहसचिव संतोष बोबडे, अपेक्स बॉडी मेंबर शुभेंद्र भांडारकर, सचिन मुळे, सुहास पटवर्धन, कल्पना तापीकर, विनायक द्रविड, अतुल जैन, राजू काणे, केशव वझे, रणजित खिरिड, सीईओ अजिंक्य जोशी आणि आयआयए व सीओएचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *