मार्शल आर्ट कराटे, तायक्वांदो स्पर्धेत मिशन मार्शल आर्ट्स अकॅडमीला जेतेपद

  • By admin
  • April 27, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः राज्यस्तरीय ऑल मार्शल आर्ट्स कराटे आणि तायक्वांदो स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर मिशन मार्शल आर्ट्स अकॅडमी संघाने चमकदार कामगिरी नोंदवत विजेतेपद पटकावले. पैठण संघाने उपविजेतेपद मिळवले. हिंगोली संघाने तृतीय क्रमांक संपादन केला. 

मिशन मार्शल आर्टस् अँड वुशु  कुंग-फु स्पोर्ट्स कराटे असोसिएशन इंडियाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील रामचंद्र हॉल येथे स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत एकूण २५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, बीड, अहिल्यानगर, परभणी, हिंगोली, अमरावती या जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. 

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक छत्रपती संभाजीनगर मिशन मार्शल आर्ट्स अकॅडमी (प्रवीण घुगे) संघाने पटकावले. द्वितीय पारितोषिक पैठण संघाने (शाम बुधवंत) संपादन केले. तृतीय पारितोषिक हिंगोली जिल्हा संघाने (नवनाथ बांगर) मिळवले
या प्रसंगी ब्लॅकबेल्ट डिग्री तीन विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. त्यात प्राप्ती भिंगारे, यश साळुंके व ओम गायकवाड या खेळाडूंचा समावेश आहे. 

पदक विजेते

या स्पर्धेत खेळाडूंनी शानदार कामगिरी नोंदवत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली. या खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे ः तनुश्री घुगे, धनश्री वाघ, सान्वी कबले, आश्लेषा रिडलॉन, झोहा सय्यद, अनुश्री घुगे, मोक्षदा पाटील, सांची लहाने, प्रिशा राठोड, गौरी घुगे, स्पंदन कामे, आर अरुंधती, समिका काळे, प्रीक्षा पद्मावर, मानसी क्षीरसागर, ओवी पाटील, श्राव्या यावले, नव्या दरगड, अर्णवी जंगले, शांभवी रंजन, अनुष्का भारती, स्वनिका जैन, भक्ती शहा, ऋतुजा दुतोंडे, सान्वी साखळकर, कोमल फतपुरे, रुचिका मिस्त्री, देवांशी भांजा, शार्वी करमाळकर, अनुष्का डोईजड, ओजस्वी करांडे, गार्गी पांचाळ, प्रांजल यादव, अन्वी पल्ले, पलक पवार, शिवण्या बोराळे, गौरी मानकर, अनु्श्री तरटे, सानिका पागोरे, श्रावणी मोतेवाल, अक्षदा पवार, दिव्या वडगावकर, अनुप्रिया सुपेकर, जिया श्रीवास्तव, सृष्टी पद्मे, रुचा खरात, लावण्या नेहे, सान्वी मगर, तनुश्री राठोड, प्राप्ती भिंगारे. 

मुले ः शाश्वत लहाने, मनीष पवार, रिषीद वरुडकर, अगस्त्या अबोटी, जयवर्धन अचलिया, अथर्व त्रिपाठी, साई माने, शिवांश डहाळे, पार्थ राणे, मयूर चव्हाण, श्रेयस बेडके, स्वरुप बनकर, आद्रियन बॅनर्जी, यशोधन घुगे, जय पाटील, अर्णव रिडलॉन, गजराज चावरिया, स्वराज नाईकनवरे, विहान शरद, विश्वजित सोळुंके, प्रसाद पद्मे, अनुज मिस्त्री, शिवम फतपुरे, यश सोळुंके, आराध्य घोंगडे, सार्थक नागे, साश्लोक करमाळकर, शर्विल यादव, श्रीजीत उढाण, अद्विक कुलकर्णी, पद्म माहुलकर, तुषार गव्हाणे, आदित्य गजबिव, अगस्त्या मामीडिसेट्टी, दिवित अग्रवाल, शर्विल चट्टे, मनीष क्षीरसागर, तेजस रक्ष्य, रियांश खेडकर, चिन्मय भालेराव, आयुष ताणगे, कैवल्य पांचाळ, जय राठोड, वीरेंद्र राठोड, दर्शल जाधव, प्रज्योत गिरबीडे, वेदांत गुंजार, पार्थ राणे, सोम्या कुमार, पियुष करोडीवाल, आयुष चौधरी, कृष्णा वाघमारे. 

प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस महिला पार्टी जिल्हा सचिव स्नेहा कोकणे पाटील, नंदा घुगे, राधा घुगे, मिशन मार्शल आर्टस् अकॅडमीचे सचिव आणि मुख्य कराटे प्रशिक्षक प्रवीण घुगे, वरद हॉस्पिटल बिडकीनचे डायरेक्टर डॉ सुरेश जंगले, निलेश पाटील, सुधीर लोखंडे, प्रजय इंगोले, अंकुश नरवडे, मिशन मार्शल आर्ट्स अकॅडमी संस्थापक अध्यक्ष पवन घुगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदक वितरण करण्यात आले. तसेच कोमल राठोड, ऋतुजा रणवळकर, ऋतुजा भालेराव, अनुश्री घुगे, धनश्री सिदवाडकर, राम चौरे, गौरव टोकटे, श्याम बुधवंत, यशोधन घुगे, नवनाथ बांगर, कुणाल पाटील, उमेश मोवाळे, फिरोज खान यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *