
छत्रपती संभाजीनगर ः कन्नड तालुका क्रीडा संकुल समितीतर्फे पॅरा बॅडमिंटनपटू निलेश गायकवाड याचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी तालुका क्रीडा संकुल समितीचे प्रभारी कार्याध्यक्ष दिलीप कुमार सोनवणे, तालुका क्रीडा संकुल समिती सदस्य व मार्गदर्शक प्रवीण शिंदे व विनोद सोलंकी, बॅडमिंटन खेळाडू कनिष्ठ दूरसंचार अधिकारी, बीएसएनएल, कन्नड क्रीडा शिक्षक विजय बारवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
निलेश गायकवाड याने पॅरा बॅडमिंटनपटू म्हणून शानदार कामगिरी बजावली आहे. सध्या निलेश याने सर्वोच्च जागतिक क्रमवारी ४ पर्यंत झेप घेतली होती. त्याने एकूण नऊ आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदके जिंकली आहेत. निलेश याने राष्ट्रीय पातळीवर १४ पदकांची कमाई केली आहे. राज्यस्तरावर त्याने २० पदके पटकावली आहेत. निलेश याने एशियन युथ पॅरा गेम्स दुबई, नॅशनल पॅरा बॅडमिंटन, जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धा थायलंड, जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धा जपान या ठिकाणी निलेश याने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
कन्नड तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष व आमदार संजनाताई जाधव, दौलतरत्न क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दौलतराव शिंदे, बॅडमिंटन खेळाडू सुरेश डोळस, राहुल पाटणी, अविनाश गायकवाड, डॉ विजय इटोले, डॉ कैलास मोती, एमआरएफ शोरूमचे संदीप शिंदे, मुक्तानंद गोस्वामी, राकेश निकम, श्याम खोसरे, वसीम शेख, विशाल दांडेकर, एजाज शहा, सचिन शेळके आदींनी निलेशला शुभेच्छा दिल्या आहेत.