आशियाई योगासन स्पर्धेत आरती पाल, गार्गी भटला सुवर्णपदक

  • By admin
  • April 27, 2025
  • 0
  • 9 Views
Spread the love

पुणे ः नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या आशियाई योगासन स्पर्धेत प्रसिद्ध योग प्रशिक्षक डॉ आरती पाल यांनी सीनियर अ गटात सुवर्णपदक पटकावले. तसेच पुण्याच्या गार्गी योगेश भट हिने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना भारताला दोन सुवर्ण पदके मिळवून दिली.

ज्युनियर गटात आर्टिस्टिक पेअर विभागात अंजली विश्नोई साथीत आणि आर्टिस्टिक ग्रुप विभागात तॄप्ती डोंगरे, ओवीया सी, दिपा लोधी व अंजली विश्नोई यांच्या साथीने सुवर्णपदक पटकावले.

प्रसिद्ध योग प्रशिक्षक डॉ आरती पाल यांनी दुसऱया आशियाई योगासन स्पर्धेत सीनियर अ गटात सुवर्णपदक पटकावले. या सुवर्ण कामगिरीबद्दल मध्य प्रदेश योग आयोगाचे अध्यक्ष वेदप्रकाश शर्मा, मध्य प्रदेश योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव दिनेश ठाकूर, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सहसचिव उदय कहाळेकर यांनी आरती पाल यांचे अभिनंदन केले आहे.

गार्गी हिने आतापर्यंत योगासनामध्ये राज्यस्तरावरील स्पर्धांमध्ये नऊ सुवर्ण, पाच रौप्य, तीन कांस्य अशी सतरा पदके जिंकली आहेत तर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिने सहा सुवर्ण, एक रौप्य व पाच कांस्य अशी एक डझन पदकांची कमाई केली आहे. गार्गीचे प्रशिक्षक श्री रविभूषण कुमठेकर आहेत आणि आर्टिस्टिक इव्हेंट साठी सध्या ती श्री स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. गार्गी ही अभिनव इंग्लिश स्कूल सीबीएससी नऱ्हे या शाळेमध्ये इयत्ता दहावी शिकत आहे. तिने लहानपणी जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारातही शालेय व अन्य स्पर्धांमध्ये भरघोस पदके मिळवली होती.

गार्गीचे वडील योगेश हे राष्ट्रीय खो-खोपटू असून त्यांनी पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघातर्फे अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

आशियाई स्पर्धेत गार्गी हिने सुवर्णपदक जिंकल्याबद्दल महाराष्ट्र योगासन फेडरेशनचे अध्यक्ष संजय मालपाणी, सेक्रेटरी राजेश पवार, सतिश मोहगावकर आणि क्रीडा भारतीचे सहसचिव उदय कहाळेकर यांनी गार्गीचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *