पुष्प अकादमीचा साऊथ सोलापूर संघावर विजय

  • By admin
  • April 28, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

रेल्वेची स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धा ः मयूर राठोड सामनावीर

सोलापूर ः मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्यूटच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत पुष्प जिमखाना क्रिकेट अकादमीने अटीतटीच्या लढतीत साऊथ सोलापूर आपटे ग्रुप ब संघाचा एक गडी राखून पराभव केला.

येथील रेल्वेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या साऊथ सोलापूरचा डाव ११७ धावांत आटोपला. विजयी ११८ धावांचे लक्ष्य पुष्प अकादमीने ९ गडी गमावत गाठले. अष्टपैलू कामगिरी करणारा मयूर राठोड (नाबाद २० व ३ बळी) सामन्याचा मानकरी ठरला. त्यास प्रवीण देशेट्टी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. प्रत्येक सामनावीर पुरस्कार सुदेश व सुनील मालप यांच्याकडून देण्यात येत आहेत. पंच म्हणून सचिन गायकवाड व नितीन गायकवाड तर गुणलेखक म्हणून गेनबा सुरवसे यांनी काम पाहिले

संक्षिप्त धावफलक

साऊथ सोलापूर आपटे ग्रुप (ब) : २८.५ षटकांत सर्वबाद ११७ (आमीर शेख ४५, चरण डिकोंडा १२, मोहम्मद जलाल ११, मयूर राठोड व रोहित बिराजदार ३ बळी, अभिजित सिंग २ बळी, सत्यजित गवळी १ बळी) पराभूत विरुद्ध पुष्प जिमखाना क्रिकेट अकॅडमी : २७.५ षटकांत ९ बाद ११८8 (अभिजित सिंग २२, मयूर राठोड नाबाद २०, जगदीश जाधव १८ धावा, जय गुंड ३ बळी, आमीर शेख व सुहान माकानदार २ बळी).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *