
शतकवीर मानव वाकोडे सामनावीर
नागपूर ः चौदा वर्षांखालील मुलांच्या राजसिंग डुंगरपूर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत विदर्भ आणि उत्तराखंड यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात विदर्भ संघाने वर्चस्व गाजवले. उत्तराखंड संघाला फॉलोऑन दिल्यानंतरही पहिल्या डावाच्या आघाडीवर विदर्भ संघाने बाजी मारली. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी बजावणारा मानव वाकोडे हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
या स्पर्धेत विदर्भ संघाने तीन सामन्यांत सात गुणांची कमाई केली आहे. या सामन्यात शतक आणि दोन बळी घेत मानव वाकोडे याने आपला ठसा उमटवला आहे. पहिल्या डावात विदर्भ संघाने ३३७ धावसंख्या उभारली. त्यानंतर उत्तराखंड संघाचा पहिला डाव अवघ्या ९६ धावांत गडगडला. फॉलोऑनमध्ये खेळताना उत्तराखंड संघाने दुसऱ्या डावात सहा बाद १५५ धावा काढल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक
विदर्भ अंडर १४ मुले ः पहिला डाव ८१.४ षटकात सर्वबाद ३३७ (नागेश उमाळे २९, मानव वाकोडे १०८, समर्थ नाथानी ३६, अथर्व पटेल २५, रौनक हेडाऊ ६६, स्पर्श धनवजीर नाबाद ४१, विवान चौधरी ३-३४)
उत्तराखंड अंडर १४ मुले ः पहिला डाव ३६.४ षटकात सर्वबाद ९६ (हिरेन त्रिवेदी ३-२६, एकांत राऊल २-१८, अथर्व पटेल २-२१)
उत्तराखंड अंडर १४ मुले ः दुसरा डाव (फॉलोऑन) ६८ षटकांत सहा बाद १५५ (अवि शुक्ला ६४, अथर्व पटेल २-३२, रौनक हेडाऊ २-२९).