
छत्रपती संभाजीनगर ः फुले शाहू भीम उत्सव जागर संविधानाचा आदर्श शिक्षक पुरस्कार माँटेसरी बालक मंदिर शाळेचे शिक्षक अजय तुपे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉक्टर मौलाना आझाद अब्दुल कलाम रिसर्च सेंटर येथे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी माजी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार एम. एम. शेख, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर, कार्यक्रमाचे आयोजक प्राचार्य पद्माकर कांबळे व डॉ. अरुण शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.
अजय तुपे हे शहरातील मॉन्टेसरी बालक मंदिर या शाळेत २९ वर्षांपासून ज्ञानदानाचे काम करत आहेत. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात त्यांनी आपला एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. खो-खो या खेळामध्ये त्यांच्या शाळेतील अनेक खेळाडू हे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केलेले आहेत. तसेच खेलो इंडिया स्पर्धेसाठी सुद्धा पात्र झालेले आहेत. या खेळाडूंचा सराव ते शाळेचे मैदान तसेच जिल्हा परिषदेचे मैदान या क्रीडांगणावर करून घेतात. जिल्हा खो-खो संघटनेचे त्यांना सहकार्य मिळत आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.