
छत्रपती संभाजीनगर ः डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी आंध्र प्रदेश येथे रवाना झाला आहे. या स्पर्धेत विद्यापीठाचा महिला सॉफ्टबॉल संघ पहिल्यांदाच सहभागी होणार आहे.
विक्रमा सिहपुरी विद्यापीठ, नेल्लोर (आंध्रप्रदेश) येथे ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतर- विद्यापीठ महिलांच्या सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महिलांचा संघ पहिल्यांदा अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत सहभागी होत असून या स्पर्धेसाठी विद्यापीठाचा संघ रवाना झाला आहे.
या संघात मयुरी चव्हाण, ईश्वरी शिंदे, अंजली विश्वकर्मा, वैष्णवी कटारे, तेजस्वी जाधव, मानसी राठोड, वैष्णवी राठोड, सुप्रिया राठोड, वैशाली पठाडे, प्रियंका कार्लेवाड, दिव्या मुंडे, कल्याणी जाधव यांचा समावेश आहे. संघा सोबत प्रशिक्षक म्हणून संतोष आवचार, सचिन बोर्डे तर व्यवस्थापक म्हणून गणेश बेटूदे हे रवाना झाले आहेत.
या संघाला कुलगुरू डॉ विजय फुलारी, प्र-कुलगुरू डॉ वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, प्रभारी क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप, क्रीडा मंडळ सदस्य डॉ उदय डोंगरे, डॉ महेश राजेनिंबाळकर, जिल्हा संघटनेचे गोकुळ तांदळे, क्रीडा विभागाचे प्रशिक्षक डॉ मसूद हाश्मी, सुरेंद्र मोदी, किरण शूरकांबळे, अभिजीत सिंग दिक्कत, गणेश कड, मोहन वहीलवार, डॉ रामेश्वर विधाते यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.