पुण्यातील गजानन पाटील प्रतिष्ठानतर्फे अंगडी, गवळी व खांडेकर यांचा सन्मान

  • By admin
  • April 29, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

सोलापूर ः शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित मार्गदर्शक माजी क्रीडा अधिकारी गुरुवर्य गजानन मारुती पाटील यांच्या ६३व्या जयंतीनिमित्त क्रीडा शिक्षक विरेश अंगडी, राष्ट्रीय खेळाडू व शहर पोलिस दलातील  सुलक्षणा गवळी, श्रीशैल खांडेकर यांचा सन्मान करण्यात आला.

पुणे येथील पत्रकार भवन सभागृहात क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल क्रीडा प्रशिक्षक व खेळाडू तसेच कठीण परिस्थितीत क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय प्राविण्य मिळवलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडू अस्लेश मस्कर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी माजी रणजी कर्णधार श्रीकांत जाधव, निवृत्त उपसंचालक जनक टेकाळे, दत्ता झोडगे, अजिंक्य जाधव, मधुकर पाटील आदी उपस्थित होते. यंदाचा क्रीडा पुरस्कार अॅथलेटिक्स क्रीडा मार्गदर्शक डॉ अरविंद चव्हाण, खेळाडू प्रणव गुरव आणि रुजूला भोसले यांना प्रदान करण्यात आला. तसेच सोमती कोडक, चैतन्य कावरे, दिव्या घोडेकर, गुलाब वसावे, भवनीत कौर, शामराव दौंडकर, दत्ता झोडगे व साची पांडे (पुणे) यांचे सत्कार करण्यात आले. तसेच विशेष सत्कार ऋतुजा वऱ्हाडे हिचा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात साची पांडे हिच्या प्रार्थनेने झाली. समारोप पसायदानाने करण्यात आला. डॉ गौरी पाटील यांनी प्रास्ताविक केले. दत्ता झोडगे यांनी आभार मानले. डॉ दीपाली गोडसे यांनी सूत्रसंचालन केले. .

पुरस्काराचे यंदा चौथे वर्ष
डॉ गौरी पाटील यांनी कै गजानन पाटील यांच्या स्मरणार्थ गुरुवर्य गजानन पाटील क्रीडा प्रतिष्ठानची स्थापना केली असून या अंतर्गत क्रीडा क्षेत्राशी संबंधित उपक्रम राबवले जातात पुरस्काराचे यंदा चौथे वर्ष होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *