छत्रपती संभाजीनगर कराटे संघाला ३३ पदके 

  • By admin
  • April 29, 2025
  • 0
  • 26 Views
Spread the love

ऑल केन्पोकाई मार्शल आर्ट्स स्पर्धा 

छत्रपती संभाजीनगर ः १५व्या ऑल केन्पोकाई मार्शल आर्ट्स कराटे स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनी एकूण ३३ पदकांची कमाई करत स्पर्धा  गाजवली. त्यात १२ सुवर्णपदक, ११ रौप्यपदक व १० कांस्य पदकांचा समावेश आहे. 

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब डांगे, भाऊसाहेब जगताप, काळु बुद्धा चौधरी, किशोर दुबे, सचिन गायकवाड, गौरव उपाध्याय, विवेक उकर्डे, प्रा वाघ, अशोक डोळस, राजू फडके, भगवान कोकाटे, महेश मेथे, मच्छिंद्र राठोड यांची उपस्थिती होती.

या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर, परभणी, नाशिक, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला या जिल्ह्यातून १२० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. छत्रपती संभाजीनगरच्या ४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनी एकूण १२ सुवर्णपदक, ११ रौप्य पदक व १० कांस्यपदक प्राप्त केले.

तसेच या स्पर्धेमध्ये पंच म्हणून समीर शेख, अतुल जाधव, स्नेहल जिनवाल, प्रियंका तरटे, आश्विनी तरटे यांनी आपली भूमिका पार पाडली. ऑल कॅन्पो काई मार्शल आर्ट असोसिएशन महाराष्ट्रचे सचिव संजय जीनवाल व अध्यक्ष अरुण माडुकर यांनी पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.  

पदक विजेते खेळाडू 

सुवर्ण ः सावी रक्ताडे, सुमनांजली खोजे, प्रत्युषा रक्ताडे, शुभ्रा कांबळे, सृष्टी रोहिदास, रुद्र गायकवाड, युवराज काळे, शिवराज बोराडे, आरुष जीनवाल, वेदांत सूर्यवंशी, राम शेटे, अश्विनी लोधे.

रौप्यपदक ः नाविन्य जाधव, गौरी आरमाळे, अवनी मेहेर, हर्षदा नलावडे, ममता तरटे, शशांक नलावडे, व्यंकटेश चौबे, रुद्र खोमणे, अभयचरण गिरबने, शांतवन निर्मल, करण गायकवाड.

कांस्यपदक ः समृद्धी राठोड, दृष्टी रोहिदास, रुद्राणी बोराडे, स्नेहल सिंग, हंसिका जैन, अनुष्का ठोंबरे, कृतिका दैगोडी, सृष्टी जैन, प्रशिक नलावडे, विनय सूर्यवंशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *