
मुंबई ः व्ही एस क्रिकेट आणि फुटबॉल अकादमी मुंबईच्या तीन विद्यार्थ्यांची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात श्रीलंकेत लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी १८ वर्षांखालील भारत अ आणि भारत ब संघासाठी घोषणा करण्यात आली आहे. या संघात व्ही. एस. क्रिकेट आणि फुटबॉल अकादमी मुंबईच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. त्यात आशिष सामल,, हर्ष व्होरा आणि खुश यादव यांचा समावेश आहे. हे तिघेही अष्टपैलू खेळाडू आहेत.
अकादमीचे उपाध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा, आयोजन सचिव नंदिनी शर्मा, कोषाध्यक्ष शरद शर्मा, सरचिटणीस राहुल शर्मा, सहाय्यक प्रशिक्षक राज साहू, सहाय्यक प्रशिक्षक जुगल राठोड यांचे या खेळाडूंचे मार्गदर्शन लाभले आहे. विजय सरांच्या अकादमीसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. अश्विन व्होरा, नेहा व्होरा, हितेश यादव, आरती यादव, जितेंद्र सामल यांनी आपल्या मुलांना शुभेच्छा दिल्या आहेत.