फालीतील विद्यार्थी कृषी क्षेत्राचे भविष्य – डॉ बी बी पट्टनायक

  • By admin
  • April 30, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love

इनोव्हेशनमध्ये जळगाव, बिझनेस प्लॅन स्पर्धेत पुणे जिल्हा प्रथम; ‘फाली’ च्या पहिल्या सत्राचा समारोप

जळगाव ः वाढती लोकसंख्येमुळे शहरीकरण वाढत आहे सोबतच औद्योगिक व नागरी वसाहतींसाठी सूपिक जमीन वापर वाढत आहे त्यामुळे शेतीउपयुक्त जमीन कमी होत आहे. यासोबतच हवामानातील बदलांसह अनेक संकटे शेतीवर येत आहेत. यावर भविष्यातील शेतीकरण्याची पद्धत बदलावी लागेल आधुनिक तंत्रज्ञानासह कमी पाण्यात व हवामानातील बदल स्विकारेल अशी बि-बियाणे, टिश्यूकल्चरची व्हायरस फ्री रोपांची निर्मिती ज्या ज्या पिकांमध्ये शक्य आहे त्यात केले पाहिजे. यासाठी अॅग्रीटेक इनोव्हेशन व बिझनेस प्लॅन फाली च्या विद्यार्थ्यांनी सादर केले ते खऱ्या अर्थाने देशाचे भविष्य आहे प्रतिपादन स्टार अॅग्रीचे स्वतंत्र संचालक डॉ बी बी पट्टनायक यांनी केले.

शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (फाली) च्या अकराव्या अधिवेशनच्या पहिल्या सत्राचा समारोप झाला. इनोव्हेशन व बिझनेस प्लॅन स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी डॉ बी बी पटनायक बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर इनोव्हेशन व बिझनेस मॉडेल स्पर्धेतील परीक्षकांसह फालीच्या संचालक नॅन्सी बॅरी, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अॅग्रीवाईज कंपनीचे सुरज पानपट्टे, युपीएलचे गणेश निकम, गोदरेज अॅग्रोवेटचे डॉ रमेश पटाले, डॉ विनोद चौधरी, अभिमन्यू ढोले, शैलेंद्र जाधव, अंकिता, दिवीसायी गौतम, प्रमोद उपाध्याय डॉ गिरिष गौतम-आयटीसी, अरुण श्रीमाली, नरेज पाटील- प्रोम्पट, मोहम्मद तौफीक, वैभव भगत-उज्जीवन, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ अनिल ढाके, किशोर रवाळे हे उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना चषक, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. सोबतच माजी फाली विद्यार्थी व शिक्षकांसह सहकार्य करणाऱ्या कंपनी प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. समूह चर्चेतून आरव बंडी,  देविका, दादासो नलवाडे, सिद्धी शिंदे, आदर्श मोहळ या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.  माजी विद्यार्थी प्रतिक रजोले, स्वप्नील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शैलेंद्र जाधव, अरूण श्रीमाली, डॉ विनोद चौधरी, मोहम्मद तौफिक या कंपनी प्रतिनिधींनीसुद्धा संवाद साधला.

पुढे बोलताना डॉ बी बी पट्टनायक म्हणाले की, क्लायमेंट चेंज सह कृषी तंत्रज्ञानावर शास्त्रज्ञ संशोधन करित आहेत त्याच धर्तीवर फालीच्या विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले हे कौतुकास्पद आहे. जैन हिल्स परिसरात पाण्याचा काटेकोर पणे वापर केला आहे त्याप्रमाणे कमी पाण्यात जास्त उत्पन्नाची शेती वाढविता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शेतकऱ्यांची मुलं ही शेतीपासून दूर जात आहेत मात्र जीवनाचे साधन हे शेती आहे हे मूळ समजले पाहिजे. प्रक्रिया करून शेतमालाचे मूल्यवर्धन केले पाहिजे त्यासाठी शीतगृहांसह गोदामांचा वापर केला पाहिजे जेणेकरून बाजारपेठातील भावांमधील चढ उतार यावर व्यवहारीकदृष्ट्या मात करता येईल.

शेती, शेतकऱ्यांबद्दलची आवड कायम ठेवा – अतुल जैन
शेत, शेतकऱ्यांबद्दलची असलेली आवड यातूनच फाली विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. जे शेतीनिष्ठ व्यवसायाला पुढे नेण्यासाठी मोलाची ठरू शकते. ज्या योजना समोर आल्यात त्यात फाली विद्यार्थ्यांची शेतकऱ्यांना निर्माण होणाऱ्या समस्यांवर सोल्यूशन देण्यासाठीची आत्मयिता दिसून येते. ही आवड कायम ठेवावी व कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडवून आणावे, यासाठी कृषी शिक्षकांसह मार्गदर्शकांची महत्त्वाची भूमिका आहे असे मनोगत जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी व्यक्त केले.

नॅन्सी बॅरी यांनी आभार मानले. रोहिणी घाडगे, हर्ष नौटियाल यांनी सूत्रसंचालन केले.

इनोव्हेशन स्पर्धेतील विजेते
फाली अकरावे अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात जैन हिल्सच्या आकाश ग्राऊंडवर अॅग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धा घेण्यात आली. त्यात संपूर्ण महाराष्ट्रातून ६१ इनोव्हेशन फालीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. शेती उपयुक्त शाश्वत सोल्यूशन काढण्याच्या प्रयत्न यातून दिसून आला. खतांमध्ये भेसळ चाचणी किट तयार करणाऱ्या अनुभूती इंटरनॅशनल रेसिन्डेंशीअल स्कूल, जळगाव (फर्टिलायझर-अॅडलचेरेशन टेस्टिंग किट) संपूर्ण प्रथम आहे. जिल्हा परिषद मुलींचे हायस्कूल, अमरावती (फ्रुट पीकर अँड कलेक्टर) द्वितीय, स्वामी विवेकानंद विद्यामंदीर, देहड, जालना (आयओटी बेस स्मार्ट फार्मिंग मॉडेल) तृतीय, जनता गर्ल्स हायस्कूल शेंदुर्जना घाट अमरावती चतुर्थ, जिजामाता हायस्कूल खापा, नागपूर (स्मार्ट ग्रीन हाऊस) पाचव्या क्रमांकाने विजयी झाले.

बिझनेशन प्लॅन सादरीकरणातील विजेते
जैन हिल्सच्या परिश्रम हॉल, बडी हांडा हॉल, गांधी तिर्थच्या कस्तूरबा हॉलसह क्लासरूमध्ये एकाच वेळी फालीच्या विद्यार्थ्यांनी बिझनेशन प्लॅन चे सादरीकरण केले. कमीतकमी भांडवल वापरून रोजगार निर्मितीसह शेतीपूरक उद्योग उभारणीसाठी ६१ उत्तम व्यवसायीक मॉडेल फालीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. यात प्रथम क्रमांकाने नवमहाराष्ट्र विद्यालय, पंदारे पुणे (लिटल लिफ स्टुडिओ), दाणोली हायस्कूल कोल्हापूर (दि कॉफी) द्वितीय, जनता गर्ल्स हायस्कूल शेंदुर्णा घाट अमरावती (ट्रेझर ऑफ रागी) तृतीय, नवजीवन सेकंडरी आश्रम स्कूल आंबातांडा छत्रपती संभाजीनगर (कॉटन पॅलेट्स) चतुर्थ, शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर पुणे (अॅग्रीवेस्ट टू इको बेस्ट) पाचव्या क्रमांकाने विजयी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *