
कुशल कक्कडची अष्टपैलू कामगिरी
नागपूर ः कुशल कक्कडच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर डीएसए सेंट्रल रेल्वे संघाने गुजदर लीग इंटर इन्स्टिट्यूट टी २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
एस बी सिटी कॉलेजच्या मैदानावर झालेल्या सामन्यात आयकर रिक्रिएशनल क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १९.५ षटकात १४५ धावसंख्या उभारली. कर्णधार अमोल जंगडे याने सर्वाधिक ४० धावा काढल्या. रेल्वे संघाने शैलेश हरबडे (४-२९) आणि कुशल कक्कड (३-३) यांनी शानदार गोलंदाजी केली.
त्यानंतर रेल्वे संघाने अवघ्या १४.१ षटकात विजयी १४६ धावसंख्या गाठली. राहुल जाधव याने नाबाद ४१ धावा केल्या. कुशल कक्कड याने ३७ धावांचे योगदान देत अष्टपैलू कामगिरी बजावली. अष्टपैलू कामगिरीमुळे कुशल कक्कड सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक
इन्कम टॅक्स रिक्रिएशनल क्लब ः ९.५ षटकांत सर्वबाद १४५ (अमोल जुनगडे ४०, शैलेश हरबडे ३-२९, कुशल कक्कड ३-२२) पराभूत विरुद्ध डीएसए सेंट्रल रेल्वे ः १४.१ षटकांत चार बाद १४८ (राहुल जाधव ४१ नाबाद, कुशल कक्कड ३७).