
मुंबई शहराच्या संकेत सावंतकडे पुरुष संघाचे नेतृत्व
मुंबई : भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने होणाऱ्या चौथ्या फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या पुरुष संघाचे नेतृत्व मुंबई शहराच्या संकेत सावंत याच्याकडे सोपविण्यात आले आहे.
अमरावती येथील संत गाडगेबाबा समाधी मंदिर मैदानातील मॅटवर २ ते ५ मे या कालावधीत ही स्पर्धा खेळविण्यात येईल. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पात्र ठरलेल्या पहिल्या आठ संघाना या स्पर्धेत प्रवेश दिला जातो. त्यामुळे महाराष्ट्राचा महिला संघ या स्पर्धेत नाही. या स्पर्धेकरीता निवडण्यात आलेला हा संघ बारामती येथील बारामती स्पोर्ट्स अकादमी येथे सराव करीत होता.
निवडण्यात आलेला कबड्डी संघ
पुरुष संघ : संकेत सावंत (कर्णधार), बालाजी जाधव, शंकर गदई, तेजस पाटील, अक्षय सूर्यवंशी, मयूर कदम, शिवम पठारे, सुरेश जाधव, आदित्य शिंदे, प्रणय राणे, अजित चौहान, आदित्य पोवार, ऋषिकेश बनकर, जयेश महाजन. प्रशिक्षक : दादासाहेब आवाड, व्यवस्थापक : आयूब खान पठाण.