भांडुपमध्ये युवा चषक भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

  • By admin
  • April 30, 2025
  • 0
  • 3 Views
Spread the love

मुंबई : युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतमाता महिला संघ यांच्या सहकार्याने युवा सेना कार्यकारणी सदस्य, युवा नेतृत्व राजोल संजय पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भांडुप (पश्चिम) येथे मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हा स्तरावरील युवा चषक २०२५ कबड्डी स्पर्धा २ ते ४ मे दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा भांडूप (पश्चिम) येथील पराग विद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी पुरुष गटांचे कबड्डी सामने या स्पर्धेत होणार आहेत. या स्पर्धेत काही दिग्गज राष्ट्रीय खेळाडू खेळणार असल्याची माहिती आयोजक सुनील डिसूजा, संकेत भेगडे यांनी दिली. स्पर्धेत रोख रकमेची पारितोषिके आणि आकर्षक चषक पहिल्या चार संघांसाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच सर्वोत्तम चढाईपटू आणि पकडपटूना देखील विशेष पारितोषिके देण्यात येतील. तसेच शिस्तबद्ध संघ चषक आणि पब्लिक हिरो चषक ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी शैलेश जागडे (99202 90520) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *