नागपूर ः नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हा युवा पुरस्कार २०२४-२५ आणि जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२३-२४ जाहीर करण्यात आले आहे. ओजस देवदळे, हरप्रितसिंग रंधावा, शर्वरी गोसेवाडे, गुरुदास राऊत व आकाश बेहनिया यांना पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी दिली.
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय कार्यक्रमात महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी आठ वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. जिल्हा क्रीडा पुरस्कार व जिल्हा युवा पुरस्कारासाठी पुरस्कारार्थींना प्रत्येकी १० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्कारेच स्वरुप आहे असे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी सांगितले.
गुणवंत खेळाडू हा पुरस्कार ओजस देवतळे (तिरंदाजी) याला थेट पुरस्कार जाहीर झाला आहे. गुणवंत खेळाडू हा पुरस्कार हरप्रितसिंग रंधावा (हँडबॉल) याला जाहीर झाला आहे. गुणवंत खेळाडू महिला पुरस्कार शर्वरी गोसेवाडे (तलवारबाजी) हिला जाहीर झाला आहे. गुणवंत खेळाडू (पुरुष दिव्यांग) गुरुदास राऊत याला जाहीर करण्यात आला आहे. युवा पुरस्कार आकाश बेहनिया याला जाहीर झाला आहे.