
जळगाव ः नवी दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या आशियाई योगासन अजिंक्यपद स्पर्धेत जळगाव येथील योगपटू डॉ शरयू जितेंद्र विसपुते यांनी सुवर्णपदक पटकावले.
जळगाव येथील एमजे कॉलेज एकलव्य क्रीडा संकुल या ठिकाणी शरयू विसपुते या नियमित योगाभ्यास करतात. या सुवर्ण कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी शरयू विसपुते यांचे अभिनंदन केले आहे.