
नागपूर ः भारती फुलमाळीच्या नेतृत्वाखालील टीम ब संघाने मंगळवारी टीम ड संघाला अटीतटीच्या सामन्यात अवघ्या ७ धावांनी पराभूत करून व्हीसीए महिला टी २० लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
व्हीसीएच्या कळमना मैदानावर झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात टीम ब संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ बाद १४५ धावा केल्या. मानसी पांडेने सर्वाधिक ४२ धावा केल्या, तर आर्या गोहणे आणि नंदिनी प्रधान यांनी अनुक्रमे ३५ आणि २५ धावांचे योगदान दिले.
कोमल झांझडच्या नेतृत्वाखालील टीम ड साठी श्रीमयी पाठक आणि साक्षी भूपाल यांनी सातपैकी पाच विकेट घेतल्या.
टीम ड संघ धावांचा पाठलाग करताना पाच बाद १३८ धावा काढू शकला. अंकिता भोंगाडे (५८) आणि रेवती कांतोडे (३८) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावा जोडल्या. परंतु धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात त्या दोघीही बाद झाल्याने त्यांचा संघ पराभूत झाला. २५ धावा आणि ३३ धावांत दोन बळी घेतल्याबद्दल नंदिनीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
टीम ब – २० षटकांत सात बाद १४५ (नंदिनी प्रधान २५, मानसी पांडे ४२, आर्य गोहणे ३५; श्रीमयी पाठक ३/२४, साक्षी भूपाल २/३५) विजयी विरुद्ध टीम ब – २० षटकांत पाच बाद १३८ (रेवती कांतोडे ३८, अंकिता भोंगाडे ५८, नंदिनी प्रधान २/३३)