अडसूळ ट्रस्ट शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेला गुरुवारपासून प्रारंभ‌

  • By admin
  • April 30, 2025
  • 0
  • 41 Views
Spread the love

मुंबई ः आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, सिबीईयु व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त होणाऱ्या लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत विनाशुल्क सुपर लीग कॅरम स्पर्धेमध्ये नामवंत शालेय खेळाडूंचे १२ संघ विजेतेपदासाठी १ ते ४ मेपर्यंत झुंजणार आहेत. 

अडसूळ प्लॅटीनम विरुद्ध एमडीसी ज्वेलर्स आणि गोविंदराव मोहिते फायटर्स विरुद्ध कॅप्टन अभिजीत चॅम्पियन्स यामधील उद्घाटनीय लढत माजी केंद्रीय राज्य अर्थमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत १ मे रोजी सकाळी ९ वाजता सिबीईयु सभागृह, दादर-पश्चिम येथे होईल.

या स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची तनया दळवी, अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूलचा ध्रुव भालेराव, पोद्दार अकॅडमी-मालाडचे प्रसन्न व पुष्कर गोळे, शिर्के हायस्कूल-रत्नागिरीच्या स्वरा मोहिरे व स्वरा कदम, न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूर आर्यन राऊत, आयईएस सुळे गुरुजी शाळेची ग्रीष्मा धामणकर, आयएनजी इंग्लिश स्कूल-वसईचा श्रीशान पालवणकर, श्री महावीर जैन इंग्लिश स्कूल-कल्याणची संचिता मोहिते, शारदाश्रम विद्यामंदिरचा सोहम जाधव, पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर व अमेय जंगम, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे नील म्हात्रे, प्रसाद माने, देविका जोशी, सारा देवन आदी विविध जिल्ह्यामधील राष्ट्रीय ख्यातीच्या सबज्युनियर कॅरमपटूसह शालेय ३६ खेळाडूंच्या सहभागाचे सर्व संघ समतोल आहेत.

प्रथम ४ गटवारीमध्ये साखळी सामने अ गटात आनंदराव अडसूळ प्लॅटीनम, एमडीसी ज्वेलर्स, दिलीप करंगुटकर स्ट्रायकर्स, ब गटात गोविंदराव मोहिते फायटर्स, कॅप्टन अभिजित चँम्पियन्स, आत्माराम मोरे प्रतिष्ठान, क गटात सिबीईयु वॉरीयर्स, अभिषेक घोषचा फेअर प्ले, राजन राणे ऑप्टीशीयन्स आणि ड गटात सुमती क्वीन, अविनाश नलावडे स्पोर्ट्स, सुरेश आचरेकर फिनिशर्स यासंघांमध्ये होणार आहेत. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ प्रीमियर लीगसाठी पात्र ठरतील. पूर्णपणे विनाशुल्क असलेल्या कॅरम उपक्रमात शालेय खेळाडूंचा चषक, प्रमाणपत्र, टी शर्ट व स्ट्रायकर आदी पुरस्कारांनी गौरव होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *